Home पिंपरी चिंचवड भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा बदलणार; महिन्याभरात सुधारित प्रस्ताव

भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा बदलणार; महिन्याभरात सुधारित प्रस्ताव

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी-चिंचवड  (दि २८ नोव्हेंबर २०२५) :-  पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठे बदल करण्याचा निर्णय पुणे महामेट्रोने घेतला आहे. वाढती लोकसंख्या, प्रवासीभार आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून नवीन सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून पुढील एका महिन्यात हा प्रस्ताव अंतिम होणार आहे.

सध्याचा दापोडी–पिंपरी मार्ग विस्तारित करत मेट्रोचे जाळे निगडीपर्यंत पोहोचले आहे. येथून चाकणपर्यंतचा दुसरा टप्पा उन्नत मार्गिका आणि ३१ स्थानकांसह आखला होता. या पूर्वीच्या आराखड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये २५ तर चाकण नगरपरिषद हद्दीत ६ स्थानके प्रस्तावित होती. या प्रकल्पाचा खर्च तब्बल १०,३८३ कोटी रुपये होणार होता.

सप्टेंबरमध्ये पालकमंत्री अजित पवार आणि लोकप्रतिनिधींनी जुन्या आराखड्यावर अनेक सूचना केल्या. विशेषत: तीनऐवजी सहा डब्यांच्या गाड्या, भोसरीचा समावेश, नाशिकफाटा–भोसरी–तळवडे मार्गाचे पर्यायी संरेखन, उड्डाणपुलातील अडथळे दूर करणे आणि सर्व स्थानकांजवळ पर्याप्त वाहनतळाची व्यवस्था अशा सुधारणांची मागणी झाली.

या सर्व मुद्द्यांचा विचार करून सुधारित आराखड्याची तयारी सुरू आहे. मार्गिका वाढल्यास खर्चात वाढ होऊ शकते, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. सुधारित आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाची मान्यता प्रक्रिया पुढे जाईल.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00