Home पिंपरी चिंचवड चिंचवडच्या मराठा दरबार हॉटेलसमोर दोन गटात हाणामारी; परस्परांवर गुन्हे दाखल..

चिंचवडच्या मराठा दरबार हॉटेलसमोर दोन गटात हाणामारी; परस्परांवर गुन्हे दाखल..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- चिंचवड येथील एस.के.एफ. कंपनीजवळील मराठा दरबार हाॅटेल समोर मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने हिंसक रूप धारण केले. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पहिल्या प्रकरणात फिर्यादी आदित्य दिनकर चिंचवडे यांनी बसवराज हेळवे, शुभम शिंदे, शाम कोळी व इतर दोन जणांनी त्यांच्याकडून दर महिन्याला २५ हजार रुपयांचा हफ्ता मागितल्याचा आरोप केला आहे. पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी दिल्यानंतर आरोपींनी रस्त्यावर पडलेली काच उचलून त्यांच्या डोक्यावर व कानावर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणात बसवराज, शुभम, शाम कोळी यांच्यासह अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून आरोपी क्रमांक ३ शाम कोळी याला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी शुभम दत्तात्रय शिंदे यांनी आदित्य चिंचवडे, कार्तिक घोडके, शिवम हगवणे, सुनिल चिंचवडे व इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादातून हाणामारी झाली. यात बसवराज हेळवे याच्या डोक्यावर काचेने प्राणघातक वार झाल्याचे नमूद आहे. तसेच आरोपींनी वायसीएम रुग्णालयापर्यंत पाठलाग करून शिवीगाळ केल्याचे, त्यानंतर दोन वाहनांनी फिर्यादीच्या चारचाकी गाडीला पाठलाग करून धडक दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दोन्ही बाजूंनी जीवघेणा प्रयत्न, मारहाण, धमक्या व वाहनाचे नुकसान या गंभीर आरोपांसह गुन्हे दाखल झाले असून पोउपनि बळीप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00