Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक दृष्टिक्षेपात..

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक दृष्टिक्षेपात..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुक दृष्टिक्षेपात आल्याची चाहूल लागताच शहरातील राजकीय हालचालींना अचानक ‘टर्बो’ लागला आहे. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ चांगलीच वाढली असून, पक्ष नेत्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांमध्ये सकाळपासून गर्दी उसळू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींनाही मोठी चालना मिळाली असून, तिकीट वाटपाचा तणाव स्पष्टपणे जाणवत आहे.

महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांतून गटबाजी, अंतर्गत स्पर्धा आणि शक्तिप्रदर्शनाची चढाओढ तीव्र झाली आहे. तुलनेत महाविकास आघाडीच्या गोटात मात्र, भयान शांतता पसरल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान संभाव्य उमेदवारांकडून छोट्या सभा, स्थानिक प्रश्नांवर प्रतिक्रिया, प्रभावी व्यक्तींशी सतत भेटी अशा उपक्रमांना वेग आला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बॅनर्स व पोस्टर्स लावून स्वतःची लोकप्रियता दाखवण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर उमेदवारांनी आक्रमक मोहीम सुरू केली असून, फेसबुक-इन्स्टाग्राम-एक्सवरून जनसंपर्क दौऱ्यांचे फोटो, व्हिडीओ, रील्स आणि ‘मी तयार’, ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ अशा टॅगलाईन्सची चलती दिसत आहे. बुस्टेड पोस्ट, डिजिटल कॅम्पेन, वर्क रिपोर्ट कार्ड यांच्या माध्यमातून स्वतःची छबी मजबूत करण्याची चढाओढ वाढली आहे.

banner

आचारसंहिता लागण्याच्या चर्चेला वेग येताच पक्षांमध्ये तिकिटांचे गणित अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुक रांगेत असल्याने पक्ष समन्वयकांवर ताण वाढला असून, अंतर्गत लॉबिंगनेही जोर धरला आहे. निवडणुक जवळ येत असल्याने “ज्याचं जास्त दिसणं, त्याची शक्यता जास्त” हे सूत्र सर्वच इच्छुकांनी पकडलेले स्पष्टपणे दिसत आहे.

शहरात राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत असून, येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीची अधिकृत धावपळ सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00