Home पिंपरी चिंचवड पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद..

पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ या नि:शुल्क असलेल्या दोन अंकी विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी मनमुराद हसत उत्स्फूर्त दाद दिली. शुक्रवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे या नाट्यप्रयोगाला माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, अनुप मोरे, सरिता साने, अतुल इनामदार, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘करून गेलो गाव’ या धमाल विनोदी दोन अंकी नाटकात सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम हे ‘अण्णा’ या मध्यवर्ती भूमिकेत सर्व प्रेक्षकांचे आकर्षणबिंदू होते. अर्थातच त्यांनी ओंकार भोजने, उषा साटम, नुपूर दुडवडकर, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, प्रणव जोशी, सुमीत सावंत, दीपक लांजेकर, सचिन शिंदे या सहकलाकारांसह आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत क्षणभरही उसंत न देता उपस्थितांना यथेच्छ हास्याची मेजवानी दिली. कोकणातील मौजे वेडगाव बुद्रूक या काल्पनिक खेड्यातील ग्रामस्थ नाटक बसवण्यासाठी एकत्र जमतात; पण स्थानिक आमदार मात्र बकुळा या नखरेल नर्तकीचा कार्यक्रम करण्याचा हट्ट धरतो. धनदांडगा, दुराग्रही आमदार विरुद्ध सारा गाव हे नाटकाचे कथासूत्र मालवणी भाषेतील द्व्यर्थी, चावट पण कोटिबाज आणि चटपटीत संवादातून अतिशय वेगाने पुढे सरकत असताना त्यामध्ये कलाकारांच्या गतिमान हालचाली, सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग याशिवाय आकर्षक नृत्ये आणि सुंदर नेपथ्य यांची गोळाबेरीज इतकी जमून आली होती की, प्रेक्षक नेमक्या ठिकाणी उत्स्फूर्त हशासह जोरदार दाद देत होते. एक सुंदर नाट्यकृती अनुभवल्याचा आनंद यावेळी उपस्थितांच्या चेहर्‍यावर होता.
नाटकाच्या मध्यांतरात नमस्कार महोत्सवाच्या संयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00