Home महाराष्ट्र महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड..

महाराष्ट्र विधानपरिषदेत अमित गोरखे यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई (दि. ०८ डिसेंबर २०२५) :– हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भाजपचे तरुण, अभ्यासू  आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी सभागृहात केली.

पुणे जिल्ह्यातील दिग्गज नेतृत्वाच्या परंपरेत नवा अध्याय जोडत गोरखे यांना पुन्हा एकदा सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखी समर्थन दिले. संतुलित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जाणारे गोरखे यांची पुनर्नियुक्ती ही जिल्ह्याच्या विधायक नेतृत्वाची मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.

पुनर्नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले,
“तालिका सभापतीपद ही केवळ भूमिका नसून विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त आणि प्रक्रियात्मक पारदर्शकतेचे प्रतीक आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास अत्यंत सन्मानाची बाब असून मी पूर्ण प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडेन.”

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मार्गदर्शनाबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

banner

वक्तृत्वशैली, मुद्देसूद अभ्यास आणि जनसंपर्कासाठी ओळखले जाणारे गोरखे हे सध्या राज्य युवा धोरण समितीचे निमंत्रित सदस्य आहेत. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे विधानपरिषदेत भाजपच्या युवा, शिक्षित नेतृत्वाला बळ मिळेल आणि सभागृहातील कामकाजात नवा ऊर्जा प्रवाह निर्माण होईल, असा विश्वास सभागृहाने व्यक्त केला आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00