Home पिंपरी चिंचवड अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून पिंपरीत विकासकामांच्या उद्घाटनांचा धुमधडाका…

अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून पिंपरीत विकासकामांच्या उद्घाटनांचा धुमधडाका…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- शाहूनगर परिसरातील अथर्व सोसायटी व शुभम सोसायटी, गंधर्व सोसायटी व गौरीशंकर सोसायटी येथील ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा आज पार पडला. हे काम आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधीमधून करण्यात आले असून नागरिकांच्या सुविधेसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यात आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंते अविनाश देवकर, जुनियर अभियंते अशोक जाधव, माजी नगरसेविका *अनुराधाताई गोरखे*, सुप्रियाताई चांदगुडे, अरुणा ताई घोळवे, रोहिणी रासकर, तुषार हिंगे, केशव घोळवे, कुशाग्र कदम, योगेश बाबर दिपाली करंजकर, कैलास दुर्गे, विशाल काळभोर, कैलास कुटे, गणेश लंगोटे, राजाभाऊ दुर्गे, शाकिर शेख, अजित भालेराव, संदीप थोरात, संदीप चव्हाण, विलास सपकाळ सुर्यकांत मोहिते, अविनाश पाटील, राहुल नाईक, सोनावले, सुधीर चव्हाण, तानाजी पवार, पाटील डी. बी, वसुले आर एस, दारकुडे एस जी, आमने सर, नवले काका, वाडेकर काका, मोहिते सर, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, विशाल कदम, सतीश क्षीरसागर, राजेश हजारे, काळूराम साकोरे उपस्थित होते.* सोसायट्यांचे चेअरमन, सचिव व सर्व सभासद देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेल्या सुविधा विकासकामांना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. काळभोरनगर व आसपासच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम साहित्य, विद्यानगर तसेच काळभोर नगर मधील अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणे, ड्रेनेज प्रणालीचे बळकटीकरण तसेच आवश्यक ठिकाणी वीजवाहिन्यांची उभारणी अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही सर्व कामे आमदार अमित गोरखे यांच्या विकास निधीतून कार्यान्वित होत असून शहराच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम मिळत आहे.

“परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्थिर विद्युतपुरवठा मिळणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसारखी कामे अत्यंत गरजेची आहेत. या कामामुळे भविष्यातील तांत्रिक अडचणी दूर होतील आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुविधा मिळतील. लोकांच्या गरजा ओळखून अशा विकासकामांना आम्ही कायम प्राधान्य देत राहू. शहराच्या विकासात आम्ही कुठेही काही कमी पडू देणार नाही.”
-आमदार अमित गोरखे…


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00