Home पिंपरी चिंचवड तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्ग उभारणीत सत्ताधाऱ्यांना दिसेना रस?..

तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्ग उभारणीत सत्ताधाऱ्यांना दिसेना रस?..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२५):- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांभोवती प्रस्तावित असलेल्या रिंगरोडसह तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाबाबत विधिमंडळात चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणींवर तातडीचा तोडगा अद्यापही दूरच असल्याचे चित्र आहे. वाहतूककोंडी कमी होईल, असा दावा करण्यात येत असला तरी काम सुरू होण्यासच किमान तीन महिने आणि पूर्णत्वास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत नागरिकांनी त्रास सहन करायचा का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारकडे माहिती मागितल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असूनही रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, अरुंद पट्टे आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर असली तरी प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठीच किमान तीन महिने लागणार आहेत.

दरम्यान, पुणे रिंगरोडच्या पश्चिम विभागाची कामे मे २०२७ पर्यंत आणि पूर्व विभागाची २०२८ पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती देण्यात आली. म्हणजेच, शहरातील अंतर्गत वाहतूक मोकळी होण्यासाठी नागरिकांना किमान दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, चाकण आणि शिक्रापूर परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका सहन करावा लागणार आहे.

तात्पुरत्या उपाययोजनांबाबत केवळ “तपासणी करून निर्णय घेतला जाईल” असे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात खड्डे बुजवणे, संकेत फलक, प्रकाशयोजना यासारख्या मूलभूत उपाययोजना कधी होतील, याबाबत कोणतीही ठोस वेळमर्यादा सांगण्यात आलेली नाही. सुमारे ३,९२३.८९ कोटींच्या भव्य प्रकल्पाच्या घोषणा होत असताना, आजच्या दैनंदिन त्रासावर मात्र ठोस उत्तर मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00