Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत 47 गुन्हेगार तडीपार!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सराईत 47 गुन्हेगार तडीपार!

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चारही परिमंडळांतर्गत जानेवारी 2026 मध्ये एकूण 47 सराईत गुन्हेगारांना तडीपार हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

चारही परिमंडळ अंतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडेची तयारी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, महिलांवरील अत्याचार ,बेकायदा शस्त्र बाळगणे आणि तडीपार आदेशाचा भंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात ही व्यापक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ एक मध्ये दहा, परिमंडळ दोन मध्ये नऊ, परिमंडळ तीन मध्ये 17 तर परिमंडळ 4 मध्ये 11 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर व काही प्रकरणात रायगड जिल्ह्यातील हद्दीतून ठराविक कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेले हे गुन्हेगार 20 ते 50 वयोगटातील असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चार परिमंडळात 24 पोलीस ठाणे असून या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. चाकण उत्तर व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेले रणजीत लक्ष्मण येरकर (वय 19, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) व रामदास मारुती साळुंखे (वय 37, रा. आंबेठाण, ता. खेड) या दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना अनुक्रमे येरवडा व नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00