Home पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी नवीन फॉर्म्युला?..

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी नवीन फॉर्म्युला?..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) :- महापालिकांमधील स्वीकृत नगरसेवक पदाबाबत भारतीय जनता पक्षाने नवीन फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यानुसार स्वीकृत नगरसेवक पदाचा कार्यकाळ पाच वर्षांऐवजी अडीच वर्षांचा करण्यात येणार असून त्यामुळे एका कार्यकाळात सात ऐवजी तब्बल १४ जणांना संधी देण्याचा भाजपचा विचार आहे.

पाटील यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकीत ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती आणि ते पराभूत झाले आहेत, अशा माजी नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे भाजपच्या पराभूत उमेदवारांमध्ये मोठा हिरमोड झाला आहे. मात्र त्यांनी पुन्हा जनतेमध्ये काम करून निवडणुकीत विजयी व्हावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीत भाजपकडून ज्यांना तिकीट नाकारण्यात आले किंवा जे तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत नव्हते, अशा कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने अधिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच ज्यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीत तिकीट देण्यात आले होते, त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याऐवजी त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांना महामंडळांमध्ये संधी देण्याचा पक्षाकडून विचार केला जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले. राज्यभरातील सर्वच महापालिकांसाठी पक्षाकडून हा निर्णय लागू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00