Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात तुर्की आणि चीनच्या उत्पादनांवर बंदी घाला – भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात तुर्की आणि चीनच्या उत्पादनांवर बंदी घाला – भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करणाऱ्या तुर्की, अझरबैजान आणि चीन या देशांच्या उत्पादनांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात एक लेखी पत्र दिले आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये आणि इतर सरकारी कामांमध्ये या देशांच्या उत्पादनांचा वापर तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी काटे यांनी पत्राद्वारे केली आहे.

शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की, अझरबैजान आणि चीन या देशांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे सरकार आणि समाजातील विविध घटकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निर्देश आहेत. या तीव्र भावना लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व सरकारी कामांमध्ये, विशेषतः महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांमध्ये आणि इतर कामांमध्ये तुर्की, अझरबैजान आणि चीनमधील कंपन्यांची उत्पादने वापरली जाऊ नयेत, अशी  मागणी त्यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास गंभीर परिणामांचा इशाराही काटे दिला आहे.

“या देशांतील कंपन्यांच्या उत्पादनांचा वापर महापालिकेकडून केला जात असल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि त्याविषयी आंदोलन व अन्य मार्गाने अशी कामे न होण्याबाबत आम्ही योग्य ती भूमिका घेऊ,” असे काटे यांनी पत्रात म्हटले आहे.

त्याचबरोबर, आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व विभागांना या संदर्भात तातडीने सूचना द्याव्यात आणि विकास प्रकल्पांमध्ये व अन्य कामांमध्ये या देशांतील उत्पादने वापरली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल, याची खात्री करावी, अशी विनंतीही काटे यांनी केली आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00