” पिंपरी चिंचवड : पोलीस आयुक्ताल येथील १३ पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक ३०/०६/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.” मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३०/०६/२०२५ रोजी १६.०० वा. पोलीस मुख्यालय, निगडी, पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. पिंपरी चिचंवड आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार खालील प्रमाणे आहेत.

पोलीस अधिकारी / अंमलदार नाव श्री. दिपक आनंदराव कांबळे पोलीस उपनिरीक्षक / अतिक्रमण विभाग श्री. सुबराव भिमराव गवारे पोलीस उपनिरीक्षक / एसीपी पिंपरी विभाग श्री. पांडुरंग विठ्ठल सोनवणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / चिखली पोलीस स्टेशन श्री. निवृत्ती चिमाजी रेंगडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / वाहतुक विभाग श्री. संजय गणपत घाडगे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पिंपरी पोलीस स्टेशन श्री. मारुती बबन पशाले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पिंपरी पोलीस स्टेशन श्री. नवनाथ रावजी पिंगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / वाहतुक विभाग श्रीमती. रागिणी संजय खांडेकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक / पोलीस मुख्यालय श्री. उत्तम विनायक तरंगे सहायक पोलीस उपनिरीक्षक / संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन श्री. दादा शिवराम खंडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक / चिखली पोलीस स्टेशन श्री. मोहन एकनाथ चोरमले सहायक पोलीस उपनिरीक्षक / आर्थिक गुन्हे शाखा श्री. पोपट मारुती भोसुरे पोलीस शिपाई ब.नं.२०१६ / वाहतुक विभाग श्री. माणिकराव शंकर ठाकरे पोलीस शिपाई ब.नं.२३२१ / पोलीस मुख्यालय सदर आयोजीत कार्यक्रमात सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पिंपरी चिंचवड यांनी त्यांचे शुभहस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, मोमेटो, झाडाचे रोपटे, भेटवस्तु (साडी) देवुन सत्कार केला तसेच त्यांचे भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या. वरिल कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त, श्रीमती श्वेता खेडकर, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. नितीन लांडगे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. महेश साळवी, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड मधील कर्मचारी वृदं व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.