Home पिंपरी चिंचवड 06 आरोपींच्या टोळक्यास ताब्यात घेवून सुमारे 3,50,000/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत

06 आरोपींच्या टोळक्यास ताब्यात घेवून सुमारे 3,50,000/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 आदरणीय सर, आज दिनांक 05/07/2025 रोजी आमचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी / अंमलदार पेट्रोलिंग करुन घरफोडी चोरी गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन रेकॉर्डवरील सराईत महीला आरोपी नामे 1) संगिता संतोष आडवाणी, वय 45 वर्षे, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी. 2) शुभांगी दत्ता देशमुख, वय 30 वर्षे, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी तसेच इसम नामे 3) हर्षद राजू तामचीकर, वय 22 वर्षे, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी. विधीसंघर्षीत नामे 4) प्रज्वल राजकुमार हिरवे, वय 16 वर्षे, रा. रेल्वेस्टेशन जवळ, आंबेडकर कॉलनी, भाटनगर, पिंपरी. 5) मयुर येडबा कांबळे, वय 15 वर्षे, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी. 6) आशिष राजू सकट, वय 14 वर्षे, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी असे मिळुन आले. छापा कारवाई वेळी पळुन गेलेले 7) यश उर्फ बाळव्या चंदु कांबळे रा. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, भारतनगर, पिंपरी यांना भारतनगर पिंपरी या ठिकाणी सांगवी येथुन पिकअप टेम्पोमधुन चोरलेले गहू, तांदुळ, खोबरे इ. धान्याचे 17 कट्टे तसेच दिघी पोस्टे हद्दीतील डुडुळगाव येथील नविन इमारतीचे बांधकामाचे ठिकाणी प्लंबीग हार्डवेअरचे नविन साहीत्य असा एकूण सुमारे 3,50,000/- रुपये किंमतीच्या मुदेमालासह गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उप निरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोउनि शिवानंद स्वामी, मपोहवा 519 उषा दळे, पो.हवा. 1603 देवा राऊत, पोना 1923 अतिश कुडके, पोकॉ 1931 शिवाजी मुंढे, 3056 तेजस भालचिम यांनी शिताफीने ताब्यात घेवून घरफोडी- चोरीचे 02 गुन्हे उघड आणले आहेत. उघडकीस आलेले गुन्हे- 1) सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 230/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे 2) दिघी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 297/2025 भारतीय न्याय संहीता कलम 305 (ए), 331 (3), 331 (4) प्रमाणे आरोपी पुर्वइतिहास- संगिता आडवानी- पिंपरी 76/2017 एनडीपीएस ऍ़क्ट 8 (सी), 21 (बी), 22 बी 247/2012 भादवि 457, 380, 34 शुभांगी देशमुख सांगवी 540/2023 भादवि 379, 511, 34 हर्षद तामचीकर पिंपरी 885/2023 , 3123/2014 भादवि 160

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00