पिंपरी-चिंचवड: सुमारे नऊ महिन्यांपासून ‘जीवे मारण्याचा प्रयत्न’ आणि ‘जबरी चोरी’ सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी संजय गजानन मरगुरे (वय २४, रा. स्वप्न हाउसिंग सोसायटी, घरकुल चिखली, पुणे) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ०२ ने अखेर ताब्यात घेतले आहे. तो सतत आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
आज, दिनांक ०६/०७/२०२५ रोजी, गुन्हे शाखा युनिट ०२ अंतर्गत अधिकारी आणि अंमलदार युनिटच्या हद्दीत पाहिजे असलेल्या आणि तडीपार आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस हवालदार २८०९ सागर अवसरे आणि पोलीस अंमलदार २१०३ लक्ष्मीकांत पतंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे आणि आरोपीचा इतिहास:
संजय मरगुरे हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खालील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता:
- गुन्हा क्र. १: चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६६९/२०२४ (भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९, ११५, १८९ (२), १९०, १९१ (२), ३२४ (४), ३५१, ३५२ (२) (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१)(३) सह १३५, महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ७). हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो सुमारे नऊ महिन्यांपासून फरार होता आणि सतत आपली ओळख तसेच राहण्याचे ठिकाण बदलत होता.
- गुन्हा क्र. २: चिखली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३५३/२०२५ (भारतीय न्याय संहिता २०२४ कलम ३०८ (३) (४), ३०९ (६), ३५२, ३५१ (२) (३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (३) सह १३५, महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ७). गुन्हा क्र. १ मध्ये फरार झाल्यानंतर त्याने चिखली पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरीचा हा गुन्हा केला होता.
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीच्या मागावर राहून पोलीस हवालदार सागर अवसरे आणि पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत पतंगे यांना गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार, पोलीस अंमलदार २०९७ उद्धव खेडकर, ३०५६ तेजस भालचिम आणि २८९२ सोहेल चिखलकर यांच्या पथकाने चिखली घरकुल परिसरातून संजय गजानन मरगुरे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी हजर केले.
आरोपीचा पूर्वेतिहास:
संजय मरगुरे याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात जबरी चोरी, दरोडा, मारामारी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे:
१. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ४५७/२०२० भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ २. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ४६१/२०२० भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ ३. भोसरी पोलीस स्टेशन ४९६/२०२० भारतीय दंड संहिता कलम ३९२, ३४ ४. पिंपरी पोलीस स्टेशन १४९/२०२२ भारतीय दंड संहिता कलम ३९५, ४२७, ५०४, ५०६, ५०६ (२), ३४; हत्यार कायदा कलम ४ (२५), ५; महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५; क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ ५. चिखली पोलीस स्टेशन १७/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३९४, ३९७, ३४; हत्यार कायदा कलम ४ (२५), ५ (२७); महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५; क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७
