Home पिंपरी चिंचवड *पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना शपथ….* 

*पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना शपथ….* 

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी,– “आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करू. आम्ही आणखी अशी प्रतिज्ञा करतो की आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद आम्ही हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवू.” अशी सद्भावनेची शपथ अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत घेऊन एकात्मतेचा निर्धार केला.

माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा सद्भावना दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सद्भावना शपथेचे वाचन केले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00