Home पुणे अनुसूचित जाती कल्याण समितीकडून ५६ उमेदवारांना महावितरणमध्ये नियुक्तीपत्रा॔चे वाटप..

अनुसूचित जाती कल्याण समितीकडून ५६ उमेदवारांना महावितरणमध्ये नियुक्तीपत्रा॔चे वाटप..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पुणे  :- अनुसूचित जाती कल्याण समितीच्या पुणे जिल्हा दौऱ्यादरम्यान महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महावितरण विभागातील २८१ नियुक्त्यांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील ५६ उमेदवारांना नुकतीच समिती अध्यक्ष नारायण कुचे, आमदार अमित गोरखे व इतर सदस्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. नियुक्त्यांबाबत बोलताना समिती अध्यक्ष नारायण कुचे व आमदार अमित गोरखे म्हणाले, “या नियुक्त्यांमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना न्याय मिळाला असून रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. हा उपक्रम वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”

या दौऱ्यात समितीमार्फत पदोन्नती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे. तसेच विविध कल्याणकारी योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहणीद्वारे तपासली जाणार आहे.

या समितीत आमदार अमोल मिटकरी, तानाजी मुटकुळे, भिमराव केराम, अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम व प्रज्ञा सातव यांचा सहभाग आहे.

banner

या दौऱ्यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रश्नांवर ठोस कार्यवाहीसाठी प्रशासनाला स्पष्ट दिशा मिळणार आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00