Home पिंपरी चिंचवड न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये विद्यार्थी दिन व वंदे मातरम गीतांचा १५० व्या वर्षाचा गौरवपूर्ण महोत्सव उत्साहात साजरा…

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये विद्यार्थी दिन व वंदे मातरम गीतांचा १५० व्या वर्षाचा गौरवपूर्ण महोत्सव उत्साहात साजरा…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

  • पिंपरी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी अरुण चाबुकस्वार सर यांच्या हस्ते..

पिंपरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत विद्यार्थ्यांना संबोधित करत शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि उद्दिष्ट निश्चित करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सरांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे, कष्टाचे मूल्य जाणण्याचे आणि समाजासाठी योगदान देण्याचे विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

शाळेच्या शिक्षिका डिंपल काळे, निशा पवार व मनोरमा पाल यांनी विचार मांडले, “विद्यार्थी हा केवळ पुस्तकांचा अभ्यास करणारा घटक नसून, तो प्रश्न विचारणारा आणि विचारप्रक्रिया सुरू करणारा व्यक्ती असतो. प्रश्न विचारणे म्हणजे ज्ञान आणि प्रगतीची पहिली पायरी. त्यामुळे विद्यार्थी दिन हा जिज्ञासा, संशोधन आणि विचारप्रवृत्ती वाढविण्याचा दिवस आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरम’ हे गीत मोठ्या अभिमानाने गायले. यंदा या गीताच्या १५० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा असल्याने हा क्षण विशेष महत्त्वाचा ठरला.हा दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर प्रेरणादायी ठरला — शिक्षण, संस्कार आणि देशभक्तीचे मूल्य अधोरेखित करणारा हा संस्मरणीय सोहळा सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.

banner

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री महाले व आभार समृध्दी वाघमारे यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00