Home पिंपरी चिंचवड तलवार हवेत फिरवत “हम यहा के भाई है, किसके…दम है तो बाहर आओ”..

तलवार हवेत फिरवत “हम यहा के भाई है, किसके…दम है तो बाहर आओ”..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी पुलाखालील पानटपरी परिसरात दोन तरुणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात ३३ वर्षीय चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिंपरी पुलाखाली घडली. फिर्यादी आकाश गायकवाड पानटपरीजवळ उभे असताना आरोपी राहुल लखन आणि साहिल बहोत हे त्यांच्याजवळ आले. “आमच्या विरोधात तक्रार करणार?” असे म्हणत आरोपींनी वाद घालत फिर्यादीला धमकावले.

त्यापैकी राहुल लखनने शर्टाखाली लपवलेली धारदार लोखंडी तलवार काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. तो वार चुकवण्याचा प्रयत्न करताना पीडिताच्या काखेजवळ घाव लागून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तलवार हिसकावून पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत फिर्यादीच्या बरगडीवर जोरदार वार बसला.

हल्ल्यानंतर दोघांनी तलवार हवेत फिरवत “हम यहा के भाई है, किसके दम है तो बाहर आओ” असे ओरडत दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

banner

या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि अनिल लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00