Home पिंपरी चिंचवड आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसह दैनंदिन कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा…

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीसह दैनंदिन कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी, दि. १७ नोव्हेंबर २०२५ : आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सार्वत्रिक निवडणुकीसह महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, मनोज शेठीया, अनिल भालसाकळे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयराज यादव, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, सिताराम बहुरे, संदीप खोत, ममता शिंदे, उपआरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, किरणकुमार मोरे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, अमित पंडित, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, मुख्य उद्यान अधिकारी महेश गारगोटे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत प्रथम शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहिम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थिती याबाबतही सविस्तर चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

banner

तसेच, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात प्रशासनाच्या सर्व शाखांकडून अहवाल सादर करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी समन्वय राखत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या मूलभूत सुविधा आणि सेवांवर अधिक भर देऊन कार्यक्षमता वाढवण्याचे आदेशही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

सर्व प्रभागांना विशेष मोहीम राबवून अवैध होर्डिंग तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बोर्डांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच परवानाधारक होर्डिंगची माहिती अद्ययावत ठेवून महसूल विभागाशी समन्वय वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00