Home पुणे तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित..

तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या लाखो जमीन व्यवहारांना आता सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सुमारे ६० लाख कुटुंबांचे, म्हणजे जवळपास ३ कोटी नागरिकांचे, जमीन व्यवहार कोणतेही शुल्क न आकारता नियमित व कायदेशीर करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला.

महसूल विभागाने यासाठी आठ मुद्द्यांची विशेष कार्यपद्धती निश्चित केली असून, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेले तुकडेबंदीविरुद्धचे सर्व व्यवहार यात समाविष्ट राहणार आहेत. याबाबतचे आदेश व संबंधित पत्रे सर्व प्रशासकीय यंत्रणेला पाठविण्यात आली आहेत.

सातबाऱ्यावरील मोठा बदल..

सातबाऱ्यावर असलेला ‘तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार’ हा शेरा कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. अनेक वर्षांपासून कायदेशीर अडचणीत असलेले छोटे भूखंड आता सरळ पद्धतीने नियमित होतील.

banner

महत्वाचे निर्णय…

गुंठेवारी पद्धतीने झालेल्या अनेक जमीन खरेदी नोंदी सातबाऱ्यावर ‘इतर हक्कात’ दाखवल्या जात होत्या. आता त्या सर्वांची नावे मुख्य कब्जेदार सदरात लावली जाणार. यापूर्वी खरेदीचा फेरफार (Mutation) रद्द झाला असल्यास, तो पुनर्तपासणी करून मंजूर करण्यात येईल. फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर झालेले व्यवहारही दस्त नोंदणी करून कायदेशीर करता येतील. यासाठी अधिकारी नागरिकांना प्रोत्साहित करतील. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर संबंधितांची नावे सातबाऱ्यावर नोंदवली जातील.

शासनाचा ऐतिहासिक निर्णय

तुकडेबंदी व्यवहार नियमित करण्यासाठी आधी दंड आकारला जात असला, तरी नागरिक पुढे न येत असल्याने पूर्णपणे विनामूल्य नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे दशकांपासून रखडलेले छोटे जमिनीचे कायदेशीर प्रश्न सुटून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00