Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात १ हजारपेक्षा अधिक तरुणांना मिळाली नोकरी…

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात १ हजारपेक्षा अधिक तरुणांना मिळाली नोकरी…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या.
यामध्ये फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांचा समावेश होता.

या मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा ते ग्रॅज्युएट अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मुलाखतीच्या माध्यमातून कंपन्यांनी विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही दिले.

महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदींनी मेळाव्याला भेट दिली.

banner

दरम्यान, डेटा विश्लेषण करून त्या आधारे नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून सीएचडीसी प्रकल्प कार्यरत असून त्या अंतर्गत या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00