Home मुंबई अबकड आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी!

अबकड आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी!

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

मुंबई (दि. ०९ डिसेंबर २०२५) :- अबकड समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि राज्य सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांनी वेगळा पोशाख परिधान करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.

आंदोलनात आमदार कृपाल तुमाने आणि आमदार काळे यांनीही सहभाग नोंदवला. अबकड समाजातील ५९ जातींच्या वंचित घटकांना न्याय मिळावा, आरक्षणाची अंमलबजावणी विलंब न लावता तात्काळ व्हावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधत सांगितले की, राज्यातील अनेक वंचित घटकांना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने समाजात रोष वाढत आहे. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी हा केवळ धोरणात्मक मुद्दा नसून, वंचितांच्या भविष्याशी निगडित जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे, असे मत आमदारांनी व्यक्त केले.

नेत्यांनी या लढ्याला पुढे आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, अबकड समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढील काळात अधिक व्यापक होणार असल्याचे संकेत दिले.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00