Home पिंपरी चिंचवड देहू फाटा परिसरातील हॉटेलमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश..

देहू फाटा परिसरातील हॉटेलमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड (दि. 13 फेब्रुवारी 2026) :- पिंपरी-चिंचवड परिसरात अनैतिक व्यापाराविरोधात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आणले. दिघी पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर छापा टाकून सहा जणांना अटक केली, तर तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहु फाटा परिसरातील साई पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या कारवाईत हॉटेलमध्ये १७ महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सुरेश पाटील आणि राज मोहन शेट्टी (दोघेही मॅनेजर), संजय अमीन बावरी, साबीर अक्तर अली, भरत बिराजदार आणि विक्रम वढ यांना अटक केली आहे. तसेच हॉटेल चालक पद्मलोचन दास उर्फ कालुशेठ आणि मालक अवधुत गाढवे यांचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, तळेगाव दाभाडे परिसरातही अनैतिक व्यापारासंदर्भात कारवाई करण्यात आली. सोमाटणे फाटा ते तळेगाव रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करताना दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दोन्ही कारवाया अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी केल्या असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00