Home पिंपरी चिंचवड ‘ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे जिवंत विद्यापीठ’ – बापू कातळे..

‘ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे जिवंत विद्यापीठ’ – बापू कातळे..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

किवळे गावातील विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने परिसरातील ५५ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आनंद, स्नेह आणि सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापू कातळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बापू कातळे आणि संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ, नारळ आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना बापू कातळे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे जिवंत विद्यापीठ आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवातून समाजाला दिशा मिळते. आपण ज्या संस्कारांवर आणि मूल्यांवर उभे आहोत, त्यामागे ज्येष्ठांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव करणे होय.”

कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांनी विशेष रंगत आणली. अजय आमटे, गफूर शेख, दशरथ वाघमारे, सुरेश गायकवाड, बापू देवरे आणि विजय उपासने यांनी विविध गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच एम. डी. चौधरी आणि रवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या ‘मेरी आवाज सुनो’ या संगीतमय कार्यक्रमाने ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकली.

banner

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संघाचे सचिव पंढरीनाथ सानप, मारुती भराटे, माणिक एकड, दिलीप रोकडे, विश्वास आंबेकर, गजानन ठाणे, बसवराज धोत्रे, राजेंद्र कदम, श्रीमंत शिवशरण, सुरेखा वाघ, सुरेखा ब्रम्हे, कल्पिता पळसुले यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00