Home गुन्हेगारी चऱ्होलीतील काळजेवाडीत वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या; परिसरात खळबळ…

चऱ्होलीतील काळजेवाडीत वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या; परिसरात खळबळ…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड :- चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शकुंतला काळूराम गिलबिले असे मृत महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. १६) सायंकाळी घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्राथमिक तपासानुसार दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पतीच्या निधनानंतर शकुंतला गिलबिले या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा अलीकडेच अन्यत्र राहण्यासाठी गेल्याने त्या घरात एकट्या होत्या. सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच दिघी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

सुरुवातीला चोरीच्या उद्देशातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याने केवळ चोरी हा हेतू नसावा, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे मालमत्तेचा वाद किंवा अन्य वैयक्तिक कारणांचा तपास केला जात आहे. पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकही तपासात सहभागी झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00