Home पिंपरी चिंचवड अनुभवाचा आदर आणि आनंदाचा सोहळा! चिंचवडमध्ये रंगला ज्येष्ठ नागरिकांचा भव्य मेळावा;

अनुभवाचा आदर आणि आनंदाचा सोहळा! चिंचवडमध्ये रंगला ज्येष्ठ नागरिकांचा भव्य मेळावा;

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

आमदार श्री शंकरशेठ जगताप आणि शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न(बापु) काटे यांच्याकडून महासंघाच्या कार्याचा गौरव! ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुसंवाद व आनंदासाठी कार्यरत असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिंपरी-चिंचवड शहर’ या संस्थेचा २३ वा भव्य वर्धापन दिन सोहळा आज बुधवार, दिनांक १७ जून २०२६ रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला आमदार श्री शंकरशेठ जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लावली. त्यांनी दीपप्रज्वलन करून महासंघाच्या सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संगीत आणि सत्कार सोहळ्याने रंगली मैफल सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दीपप्रज्वलन आणि महासंघाच्या सर्वसाधारण आमसभेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘संगीतसरिता’ प्रस्तुत मराठी व हिंदी गाण्यांच्या बहारदार संगीतमय कार्यक्रमाने सभागृहातील वातावरण थिरकून गेले आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा जाहीर सत्कार आणि मनोगताचा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये उपस्थित ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक” – श्री शत्रुघ्न काटे याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न (बापु) काटे यांनी महासंघाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा मुख्य पाया आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या पिढीला नक्कीच होतो. महासंघाने गेल्या २३ वर्षांत ज्येष्ठांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सुखासाठी आमचे सहकार्य नेहमीच पाठीशी राहील.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार याप्रसंगी उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर,विरोधी पक्ष नेते श्री भाऊसाहेब भोईर,नगरसेवक श्री विनायकदादा गायकवाड, नगरसेवक श्री कुणालभाऊ वाव्हळकर, नगरसेविका सौ.श्रुतीताई वाकडकर, नगरसेविका सौ आरतीताई चोंधे,मंडल अध्यक्ष श्री जयदीपभाऊ खापरे,श्री रामभाऊ वाकडकर,श्री नामदेवराव ढाके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषालीताई मरळ, कार्याध्यक्ष श्री.विजय शिनकर, सरचिटणीस श्री. ईश्वरलाल चौधरी, सह-सरचिटणीस श्री. एकनाथ घुले,कोषाध्यक्ष श्री. हेमचंद्र जावळे,स्वीकृत सदस्य व महासंघ प्रवक्ता श्री. अरुण बागडे आणि स्वीकृत सदस्य श्री. खंडू बिरदवडे यांच्यासह महासंघाच्या सर्व सदस्यांनी व पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00