Home पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस द्या..

महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस द्या..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना ठेकेदार संस्थाकडून दिवाळी बोनस मिळावा, याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश बाजीराव पटेकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत कामगारांना नियमाप्रमाणे एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस द्यावा, अशी मागणी केली होती.

मनसेने स्पष्ट इशारा दिला होता की, “बोनस न दिल्यास आयुक्तांच्या दालनात दिवाळीचे फटाके फोडून निषेध नोंदवला जाईल.” यापूर्वीही बोनस वेळेत न दिल्याने आंदोलन करावे लागल्याचे पटेकर यांनी निवेदनात नमूद केले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयातून पत्रक जारी करून तातडीने दखल घेण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की, “कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटींनुसार दिवाळी बोनस देणे बंधनकारक आहे. संबंधित ठेकेदारांनी नियमांचे पालन करावे. बोनस रकमेची कपात करून किंवा पगारात समाविष्ट करून देणे चुकीचे आहे. ठेकेदारांनी कामगारांना थकबाकी बोनस लवकरात लवकर अदा करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.”

या पत्रामुळे मनसेच्या मागणीला यश मिळाले असून, हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार आहे. बोनससाठी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा कामगारांकडून व्यक्त होत आहे.

banner

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00