पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुले व मुली ५५ रहाटणी येथील महानगरपालिका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक वाटप व शैक्षणिक नव्या पर्वाच्या शुभारंभानिमित्त नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अभ्यास, आवडी-निवडी व शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने विद्यार्थ्यांनशी गप्पा गोष्टी केल्या.यावेळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण महत्व समजून एक पेड स्कूल के नाम या आशयाने विद्यार्थ्यांन कडून एक एक झाड लावून त्याची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षक वर्गानी स्वतः घेतली.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हेच सर्वात मोठे साधन असून, प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने पुढे जावे, तुम्हीच उद्याचे भविष्य आहात असा संदेश व शुभेच्छा नगरसेविका अर्चना तापकीर यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
या प्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून या उपक्रमाला आणखी प्रेरणा मिळाली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.