Home पिंपरी चिंचवड लाचखोरीप्रकरणी पालिकेचा बीट निरीक्षक निलंबित..

लाचखोरीप्रकरणी पालिकेचा बीट निरीक्षक निलंबित..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी चिंचवड :- पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तथा बीट निरीक्षक उमेश अरुण लोंढे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोंढे यांनी पिंपळे गुरव येथील एका तक्रारदाराच्या तीन मजली अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना रहाटणीतील ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना 12 जून रोजी रंगेहात पकडले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती.

लोकसेवक म्हणून पदाचा गैरवापर, कर्तव्यातील सचोटीचा अभाव आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत लोंढे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना महापालिकेत रुजू होऊन अवघे तीन महिने झाले होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00